झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय तेरावा – भाग ७

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय तेरावा : क्षेत्रक्षेत्रज्ञयोग

प्रकृति गुणांहीं । होतीं कर्में लोकीं ।।
जाणे तो विवेकी । ज्ञानी खरा ।।२६।।

आळवाचे पान । असोनी पाण्यांत ।।
जैसें ना भिजत । पाणियानें ।।२७।।

तैसा आत्मा जरी । शरीरीं वसतो ।।
तरी न लिंपे तो । पापपुण्यें ।।२८।।

सूर्य जसा साऱ्या । प्रकाशवी जगा ।।
क्षेत्रज्ञ तसा गा । क्षेत्रलागीं ।।२९।।

जाणे जो हें सारें । मर्म पार्थराया ।।
मोक्ष मग तया । हातोहातीं ।।३०।।

Chapter 13 – Field and Functionary

Bodily features । Cause occur actions ।
The sensible ones । Know the fact ।।26।।

A leaf of elephants ear । Comes up over water ।
Doesn’t get however । Moistened ।।27।।

The soul similarly । Resides in the body ।
Isn’t affected by bodily । Merit or sin ।।28।।

Just as the Sun । Brightens the world ।
A husbandman makes । His field’s grade ।।29।।

That who senses । This core essence ।
Has easy access । To salvation ।।30।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ त्रयोदशोऽध्यायः । क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग:

श्रीभगवानुवाच

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply