रत्नागिरीत बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या आजही अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ मे) करोनाचे नवे ३४३ रुग्ण आढळले, तर ४३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज सलग तिसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३१ हजार २८३ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ६६, दापोली २३, खेड १०, चिपळूण १४, संगमेश्वर ६, लांजा १५ आणि राजापूर ८ (एकूण १४२). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ३. (एकूण ३). (दोन्ही मिळून १४५). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १९८. (सर्व मिळून ३४३).

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ४०० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार २९१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५० हजार १४८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४३२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २५ हजार ९२३ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८२.८६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ५ आणि आजचे ११ अशा १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ९६० झाली असून मृत्युदर ३.०६ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २७५, खेड १०७, गुहागर ४०, दापोली ८२, चिपळूण १८७, संगमेश्वर १३४, लांजा ५५, राजापूर ७०, मंडणगड १०. (एकूण ९६०).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply