रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ मे) करोनाचे नवे ३१५ रुग्ण आढळले, तर ४६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ५०, गुहागर ४, चिपळूण ४६, लांजा ४ आणि राजापूर १ (एकूण १०५). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत एकमेव रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १०६). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण २०९. (सर्व मिळून ३१५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३३ हजार ५५४ झाली आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ४०२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ४९१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५८ हजार ९०३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ४६२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २९ हजार ३९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८६.५४ टक्के आहे.
जिल्ह्यात आज १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ११३ झाली आहे. मृत्युदर ३.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३१९, खेड ११८, गुहागर ६२, दापोली ९९, चिपळूण २२२, संगमेश्वर १४५, लांजा ५९, राजापूर ७७, मंडणगड १२. (एकूण १११३).

