रत्नागिरीत ६१० नवे बाधित, २७५ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ जून) करोनाचे नवे ६१० रुग्ण आढळले, तर २७५ जण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमीच आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ४३३, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १७७ (दोन्ही मिळून ६१०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३८ हजार ७२ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार २४८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत.
आरटीपीसीआरसाठी एक हजार ७१४, तर अँटिजेन टेस्टसाठी एक हजार ५७७ चाचण्या आज घेण्यात आल्या. त्यामध्ये आरटीपीसीआनुसार ४३३, तर अँटिजेन चाचण्यांनुसार १७७ असे एकूण ६१० रुग्ण आज आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७४ हजार ८०७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज २७५ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३२ हजार ५६५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.५३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. खेड तालुक्यात २, तर चिपळूण, गुहागर, राजापूर, रत्नागिरी, लांजा आणि दापोली तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आज नोंदविला गेला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार २५९ झाली आहे. मृत्युदर ३.३० टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३६३, खेड १२७, गुहागर ९०, दापोली ११०, चिपळूण २४४, संगमेश्वर १५३, लांजा ६८, राजापूर ९२, मंडणगड १२. (एकूण १२५९).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply