a young girl protesting against the war in ukraine

युक्रेनमध्ये अडकले रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी

रत्नागिरी : रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे साऱ्या जगावर भीतीचे सावट आहे. वेगवेगळ्या देशांतील नागरिकांसोबतच अनेक भारतीय नागरिकही युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, त्या नागरिकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थीही अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने या विद्यार्थ्यांची नावे एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहेत. हे सारे विद्यार्थी MBBS अर्थात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यापैकी तीन विद्यार्थी देवरुखचे असून, मंडणगड, लांजा, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांतील प्रत्येकी एक विद्यार्थी तेथे अडकला आहे.

अद्वैत विनोद कदम (देवरुख) (MBBS पहिले वर्ष), साक्षी प्रकाश नरोटे (देवरुख) (MBBS पहिले वर्ष), जान्हवी उमाकांत शिंदे (देवरुख) (MBBS दुसरे वर्ष), वृषभनाथ राजेंद्र मोळज (चिपळूण) (MBBS पहिले वर्ष), आकाश अनंत कोगनाक (मंडणगड) (MBBS तिसरे वर्ष), मुस्कान मन्सूर सोलकर (मिरकरवाडा, रत्नागिरी) (MBBS पहिले वर्ष), सलोनी साजिद मणेर (लांजा) (MBBS पहिले वर्ष), ऐश्वर्या मंगेश सावंत (दापोली) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

देवरुखचे तिन्ही विद्यार्थी युक्रेनमधील खारकीव्ह या शहरात अडकले आहेत. अन्य विद्यार्थी उझोरोड, झुयोव्हा (टर्नोपिल), ल्युओनो, झॅपोरोझाय आदी शहरांत अडकले आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी नागरिक अथवा विद्यार्थी युक्रेन येथे अडकले असतील, तर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी ०२३६२-२२८८४७ या क्रमांकावर किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासाठी खास हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याचे संपर्क क्रमांक असे –
टोल फ्री नंबर : १८००११८७९७
अन्य नंबर्स : ०११-२३०१२११३, २३०१४१०४, २३०१७९०५
फॅक्स : ९१-११-२३०८८१२४
ई-मेल : situationroom@mea.gov.in

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply