वेर्ले (सावंतवाडी) येथे १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिर

सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे येत्या १० एप्रिल रोजी वेर्ले (ता. सावंतवाडी) येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले क्र. २ अमृत महोत्सव समिती आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी शाखेने या शिबिराचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ९ ते दुपारी साडेबारा या वेळेत हे शिबिर होईल.

शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हे शिबिर होईल. रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनील राऊळ (9422055010, 9075739577)
समिती अध्यक्ष विष्णू राऊळ (9421085792), उपाध्यक्ष प्रसाद गावडे (9420306537),
सतीश लिंगवत ( 9423882693), डॉ. संजीव लिंगवत ( 9421268268), रवींद्र तावडे (9421371483
).

रक्तदानासाठी येताना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, कफ, श्वास घेण्यास त्रास होणार्‍या व्यक्तींनी येऊ नये. वयोगट- १८ वर्षे ते ५५ वर्षे आणि वजन ५० किग्रॅपेक्षा जास्त असावे. रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण झोप झालेली असावी. जागरण नसावे. अॅस्पिरीन, पॅरासिटॅमल आणि इतर कोणत्याही प्रकारची औषधे घेतलेली नसावीत. रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी पुरेसे जेवून विश्रांती घ्यावी. सकाळी येताना भरपेट अल्पोपाहार करून यावे. कोविड लस घेतली असेल, तर ती घेऊन पंधरा दिवस झालेले असावेत. म्हणजेच २६ मार्चपूर्वी लस घेतलेले रक्तदाते रक्तदानास पात्र आहेत.

मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने केले आहे.

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक : https://www.facebook.com/groups/585494969048692/

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply