रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे निसर्ग परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील परिसराविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण होण्याच्या हेतूने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे या निसर्ग परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १८ आणि १९ एप्रिल रोजी हे शिबिर होणार असून शिबिरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतील.
निसर्ग परिचयासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, पर्यावरण प्रकल्पविषयक मार्गदर्शन, पर्यावरणपूरक वस्तू निर्मिती यासंदर्भातील सत्रांचे आयोजन शिबिरात करण्यात आले आहे. निसर्ग परिचयाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी निसर्ग सहलीचे आयोजनही शिबिरात करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. शरद आपटे (९४२३२९२०९५) किंवा डॉ. सोनाली कदम (९४२०५२४६४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

