रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिसरे मोठे क्षितिज उन्हाळी शिबिर आयोजित केले आहे. येत्या ११ ते १३ मे या कालावधीत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या डोर्ले (ता. लांजा) येथे हे शिबिर होणार आहे.
शिबिरात फन गेम्स, जंगल कुकिंग, कॅम्प फायर, ट्रेजर हंट, टीम बिल्डिंग गेम्स इत्यादी अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. तीन दिवसांचे शुल्क २५० रुपये आहे. त्यामध्ये चहा, अल्पोपाहार आणि भोजनाचा समावेश आहे. इच्छुक तरुणांनी सोबतच्या लिंकवर ग्रुपला जोडले जावे आणि पुढील माहिती तेथेच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रुपला जोडले जाण्यासाठी लिंक अशी – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfiD0CQ3dlR5WjrEblgNqQd5ZdheAOqVf-_kptijv7xAXlykQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

