५१ हजार सूर्यनमस्कारांची रथसप्तमीला संकल्पपूर्ती

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्याची संकल्पपूर्ती रथसप्तमीला होणार आहे.

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे व ज्येष्ठ रंगकर्मी सामाजिक कार्यकर्ते, आंबव पोंक्षे येथील श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष अशोक पोंक्षे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंद साठे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

येत्या १६ तारखेला रथसप्तमीच्या दिवशी शाळेच्या मैदानावर सामूहिक सूर्यनमस्कार होणार आहेत. त्यानंतर संकल्पपूर्तीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घातले आहेत, अशांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहेत.

या ५१ हजार सूर्यनमस्कारांच्या संकल्पपूर्तीत गुरुकुलपूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गुरुकुलपूरक उपक्रम प्रमुख सचिन साठे यांनी अपार मेहनत घेतली आहे. हा संकल्प १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी युवा दिनाचे औचित्य साधून करण्यात आला होता. सूर्यनमस्कार सुरू असताना वेळोवेळी सचिन साठे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारांचे महत्त्व पटवून दिले आहे. दोन वर्षांपूर्वी शाळेने १ लाख ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडून तो यशस्वी केला होता.

रथसप्तमीच्या दिवशी होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply