खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..
झोंपाळ्यावरची गीता – अध्याय दुसरा – सांख्ययोग
लक्ष्मी ही होऊन । आली तुझ्या घरा ।।
नको पाठमोरा । होऊं सख्या ।।१८।।
खुलें स्वर्गदार । नको पाय मागें ।।
घेऊं; हेंच मागें । सख्या माझ्या ।।१९।।
जे का पुण्यवंत । लाभें तयांसीच ।।
युद्ध असें साच । पूर्वपुण्यें ।।२०।।
मोहें न करिशी । जरी तूं हें युद्ध ।।
हानी केली सिद्ध । आपेंच तूं ।।२१।।
Chapter 2 – Soul, the immaterial
Prosperity here । At your door ।
Don’t my brother । Turn back ।।18।।
Door of heaven । About to open ।
All of a sudden । Don’t pull back ।।19।।
Opportunity goes । Only to those ।
Luck by strokes । Who are blessed ।।20।।
Oh, allurement sufferer । If withdraw from warfare ।
Great loss is sure । Shall you mark ।।21।।
(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)
……..
श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
द्वितीयोऽध्यायः । साङ्ख्ययोगः
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥२-३२॥
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥२-३३॥
(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…

