झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय दुसरा – भाग ६

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय दुसरा – सांख्ययोग

अपेश बांधूनी । कां रे पदरांत ।।
जासी नरकांत । सख्या माझ्या ।।२२।।

म्हणतील काय । याची लाज न का।।
कसें तोंड लोकां । दाविशील ? ।।२३।।

खऱ्या संभावीता । होतां मानहानी ।।
वाटे जीवघेणी । मृत्युहूनी ।।२४।।

मानिती जे आज । तेचि म्हणतील ।।
बागुलाला भ्यालं । पार्थबाळ ।।२५ ।।

Chapter 2 – Soul, the immaterial

Oh, my brother । Embracing failure ।
Approach hellfire । Why do so? ।।22।।

All will condemn । Saying shame, shame ।
Ruining own fame । How’ll face others ।।23।।

For any gentleman । Losing the reputation ।
No less than termination । Of one’s life ।।24।।

Those who hail । Will tomorrow tell ।
Parth did fail । To face bugaboo ।।25।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
द्वितीयोऽध्यायः । साङ्ख्ययोगः

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥२-३४॥

भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥२-३५॥

अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥२-३६॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply