रत्नागिरीत ४ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात एकही नवा रुग्ण नाही

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ जानेवारी) करोनाचे नवे ४ रुग्ण आढळले, तर १५ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एकही नवा रुग्ण आढळला नाही, तर ७ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात एक करोनाबाधित रुग्ण आढळला. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात एक, तर चिपळूण तालुक्यात दोन नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ४) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९४९३ झाली आहे. आज आणखी १०६४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६९ हजार ५४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८१ आहे. त्यातील सर्वाधिक २९ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २४ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज १५ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९०४९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.३२ टक्के झाला आहे. आज जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या ३४७ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे. रत्नागिरी तालुक्यातील ७६ वर्षांच्या महिलेचा २६ जानेवारी रोजी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२७ जानेवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, एकही नवा करोनाबाधित आढळला नाही. सात जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६१८६ एवढीच आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५८०० झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६५ आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply