रत्नागिरी पोलीस, लायनेस क्लबतर्फे वाहतूक सुरक्षा निबंध स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी लायनेस क्लब आणि रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे.

स्पर्धेचे विषय असे – १. हेल्मेटसक्ती योग्य-अयोग्य,

२) माझे अपघातविषयक अनुभव,

३) वाहतुकीचे नियम आणि त्यांचे पालन,

४) कोविड परिस्थितीमुळे कायदे आणि एकूणच सरकारी नियमांचे पालन करायला शिकलेला “माझ्या मनातला २०२० नंतरचा भारत”.

स्पर्धेकरिता निबंध मराठी अथवा इंग्रजी भाषेत लिहिलेला असावा. शब्दमर्यादा ८०० ते १००० असून निबंध ए-४ आकाराच्या कागदावर लिहिलेला अथवा टाइप केलेला असावा. निबंध ७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बी-४७, लाला कॉम्प्लेक्स, गोगटे कॉलेज रोड, रत्नागिरी येथे आणून जमा करावा अथवा पाठवावा.

स्पर्धेचा निकाल १० फेब्रुवारीपर्यंत जाहीर करण्यात येईल. उत्कृष्ट निबंधातून पहिले २ आणि एक उत्तेजनार्थ क्रमांक निवडला जाईल. रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply