रत्नागिरीत करोनाबाधितांची संख्या ३९ हजारावर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (४ जून) करोनाचे नवे ५९० रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ३९ हजारावर गेली आहे. आज ३२९ जण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अजूनही वाढलेले नाही.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ३७९, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २११ (दोन्ही मिळून ५९०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३९ हजार ५१ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ३२५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत.
आरटीपीसीआरसाठी एक हजार ३४३, तर अँटिजेन टेस्टसाठी एक हजार ९८५ चाचण्या आज घेण्यात आल्या. त्यामध्ये आरटीपीसीआनुसार ३७९, तर अँटिजेन चाचण्यांनुसार २११ असे एकूण ५९० रुग्ण आज आढळले. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ८९६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३२९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३३ हजार ४२० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.५८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १२, तर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी २ रुग्णांचा मृत्यू आज नोंदविला गेला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ३०६ झाली आहे. मृत्युदर ३.३४ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३७९, खेड १३२, गुहागर ९२, दापोली ११५, चिपळूण २५६, संगमेश्वर १६०, लांजा ६८, राजापूर ९२, मंडणगड १२. (एकूण १३०६).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply