रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ जानेवारी) करोनाचे नवे १४७ रुग्ण आढळले, तर २४६ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या ११०८ झाली आहे. आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८१ हजार ३७९ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७७ हजार ७७४ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.५७ झाली आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५८५ पैकी ४८६ निगेटिव्ह, तर ९९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ३९० पैकी ३४२ नमुने निगेटिव्ह, तर ४८ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ८२ हजार ८६० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ११०८ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ९११, तर लक्षणे असलेले १९७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८९९ असून, संस्थात्मक विलगीकरणात २०९ जण आहेत. केवळ २ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ९६, तर डीसीएचमध्ये १०१ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये १२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण दाखल नाही.
आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९५ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२७ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०७ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७५, चिपळूण ४८१, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३१, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९५).
लसीकरणाची स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ४ सत्रे पार पडली. त्यात ११ जणांनी लशीचा पहिला, तर २३२ जणांनी दुसरा डोस घेतला. १६ जानेवारीला १८ वर्षांवरच्या एकूण २४३ जणांचे लसीकरण झाले. १६ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ४६४ जणांचा पहिला, तर ७ लाख ८० हजार ७३८ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत.
जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील २०७१ जणांनी १५ जानेवारीला लशीचा पहिला डोस घेतला असून, ७७७ जणांनी लशीचा बूस्टर अर्थात तिसरा डोस घेतला आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड