pexels-photo-4031867.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा शंभराहून अधिक वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ जानेवारी) करोनाच्या नवबाधितांमध्ये पुन्हा एकदा शंभराहून अधिक वाढ झाली काल नवे १५५ रुग्ण आढळले होते, आज २६९ नवे रुग्ण आढळले. आज १९५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२३९ झाली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८३ हजार १७१ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७९ हजार ३८५ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.४५ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ६५२ पैकी ५२९ निगेटिव्ह, तर १२३ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १,१७१ पैकी १,०२५ नमुने निगेटिव्ह, तर १४५ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ९४ हजार ६७० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,२३९ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ९६७, तर लक्षणे असलेले २७२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९११ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३२८ जण आहेत. एकूण ४२ रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १३१, तर डीसीएचमध्ये १४१ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ५६ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ५ रुग्ण दाखल आहेत.

आज एका आणि यापूर्वीच्या दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५०५ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ०.५८ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.०८ टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२९, गुहागर १७७, चिपळूण ४८२, संगमेश्वर २२६, रत्नागिरी ८३३, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५०५).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात २४ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ८० सत्रे पार पडली. त्यात ५५५ जणांनी लशीचा पहिला, तर ३,१५७ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण ३,७१२ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील २५७, तर ६१० जणांनी बूस्टर डोस घेतले. २४ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४६ हजार ८१ जणांचा पहिला, तर ८ लाख १० हजार ४५५ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply