pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा नवा एकमेव रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ फेब्रुवारी) करोनाचा नवा एकमेव रुग्ण आढळला, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४३४ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ८५० म्हणजे ९६.९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २२६ पैकी २२५ निगेटिव्ह, तर एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या सर्व २९८ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २५ हजार २४० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ५० रुग्णांपैकी लक्षणे नसलेले २४, तर लक्षणे असलेले २६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात २४, तर संस्थात्मक विलगीकरणात २६ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ११, तर डीसीएचमध्ये १५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तर अतिदक्षता विभागात १ रुग्ण दाखल आहे.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ६.४५ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात आज, २७ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने तसेच पल्स पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे करोनाप्रतिबंधक लसीकरणाचे केवळ एकच सत्र पार पडले. त्यात ३ जणांनी लशीचा पहिला, तर ७ जणांनी दुसरा डोस घेतला. आजपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ९० जणांचा पहिला, तर ८ लाख ५८ हजार ६७९ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख १ हजार ६५२ जणांचे लसीकरण झाले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply