झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय नववा – भाग ८

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय नववा : राजगुह्य

अंकुर बीजांत । बीज अंकुरांत ।।
काय ही गंमत । ठावी नाही ।।२९।।

पूर्ववयामधें । असूनि अधम ।।
जरी अंतीं मम । भक्ति करी ।।३०।।

तरीही मानावें । साधू बा तयाशीं ।।
भय न भक्ताशीं । माझ्या कोठें ।।३१।।

पूर्वार्जितें जरी । हीन जन्म आला ।।
तरी मुक्ति त्याला । माझ्या संगें ।।३२।।

Chapter 9 – The Divine Secret

You know about । Seed generates as sprout ।
That carries out । Again a seed ।।29।।

A vile earlier । Inside however ।
Singing my prayer । Mindfully ।।30।।

Such a worshipper । Is my dear ।
Has no fear । Call him a sage ।।31।।

For deed earlier । Now born lower ।
By my favour । Obtains peace ।।32।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ नवमोऽध्यायः । राजविद्याराजगुह्ययोगः

श्रीभगवानुवाच ।

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥९-३०॥

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥९-३१॥

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥९-३२॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply