रत्नागिरी : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी शिवाजी पार्क जिमखाना महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत मुंबईत दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्यात होणार आहे. त्या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा क्रीडा वर्षातील पहिली राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने खेळाडूंनी या वर्षाची ५० रुपयांची जिल्हा रजिस्ट्रेशन फी आणि राज्य रजिस्ट्रेशन फी ९०० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. राज्य स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी प्रत्येकी ७०० रुपये असेल. स्पर्धेची पुरुष व महिला एकेरीची प्रवेशिका रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे कार्यवाह मिलिंद मधुसूदन साप्ते (९४२२४३३०५५) यांच्याकडे येत्या १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह द्यावी. त्यानंतर आलेल्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धेत १८ वर्षांखालील मुले व मुलींना भाग घ्यावयाचा असल्यास त्यांना प्रवेश फीमध्ये सवलत मिळेल. त्यांच्यासाठी एकेरी गटासाठी प्रत्येकी ३५० रुपये प्रवेश फी राहील, असे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे कार्यवाहक मिलिंद मधुसूदन साप्ते यांनी कळविले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
